जिल्ह्यात आज ८४३ बाधीत; ७४० रूग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ८४३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून  ७४० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव शहरातील संसर्ग कमी होत चालल्याचे आजही दिसून आले असून चोपडा, भुसावळ, अमळनेर आदी तालुक्यात मात्र रूग्णसंख्या वाढीचा दर कायम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-६९, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ-८९, अमळनेर-९४, चोपडा-१०७, पाचोरा-७९, भडगाव-३, धरणगाव-२६, यावल-२०, एरंडोल-२८, जामनेर-६४, रावेर-५१, पारोळा-१४, चाळीसगाव-६२, मुक्ताईनगर-६३, बोदवड-४२ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ८४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३१ हजार ५७४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख १९ हजार ३०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ९ हजार ९०३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content