गणेश कॉलनीत तरूणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरात मोबाईलवर बोलत असलेल्या तरूणाच्या हातातून ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणारा यशवंत जगन्नाथ शिंपी (वय-२५) रा. श्रीहरी नगर गणेश कॉलनी हा आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. सोमवार ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी परिसरात शतपावली करत मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात दोन भामटे त्यांच्या मागून येवून यश्वंतच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीची मोबाईल हिसकावून धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी यशवंत शिंपी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुषार जावरे करीत आहे.

Protected Content