सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जळगावात रक्तदान शिबीराचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सोमवार, दि.११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत या करीता राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम”  दि. ६ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करावी, असे शासन निर्देश आहे.

त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळरोड, मायादेवी मंदिरासमोर जळगाव येथे दि. ११ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हयातील इच्छुक नागरीकांनी सदर शिबीरामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं असं आवाहन,  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केलं आहे.

Protected Content