यावल तालुक्यात कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुका आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील गावे, झोपडपट्ट्या, पांड्यांमध्ये आजपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान (एलसीडीसी) व सक्रिय क्षयरोग शोध (एसीएफ) जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान ही मोहीम 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या संयुक्त कुष्ठरोग शोध व जागरूकता अभियाना अंतर्गत यावल तालुक्यात ग्रामीण २११ आणि शहरी क्षेत्रासाठी १० पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. पथक आपल्या कुष्ठरोग शोध मोहीम जागरूकता अभियान सकाळी ७ वाजेला सुरुवात करणार आहेत. तसेच सर्व गावामधून/शहरातील नागरीकानी आशाताई यानी गृह भेट दिली असता त्यांना नागरीकांनी सहकार्य करावे व आजाराचे लक्षण असल्यास त्याना साविस्तर माहीती देवुन आणि तपासणी करून घ्यावी. संबंधीत रूग्णाच्या आरोग्य विभागाव्दारे आजाराचे निदान झाल्यास तात्काळ उपचार सुरू करण्यात येईल.

कुष्ठरोग मोहीम अंतर्गत आपल्यावर आरोग्य विभागाच्या वतीने होणाऱ्या उपचाराची माहिती गुप्त ठेवण्यात येईल, तरी यावल तालुक्यातील सर्व नागरीकांनी शासनाच्या या आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहीम व जागरूकता या अभियानास १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे, अशी माहिती व आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यावल गफुर तड़वी यांनी केले आहे.

यावल तालुका आरोग्य विभागातील क्षयरोग, पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपुर्ण मोहीम राबविली जाणार आहे.

Protected Content