काही राज्यांची शाळा उघडण्याची तयारी

मुंबई : वृत्तसंस्था । ‘अनलॉक’च्या प्रयत्नात खबरदारी घेऊन अनेक राज्यांकडून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, अनेक राज्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. २१ सप्टेंबरपासून काही ठराविक राज्यांत इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत. सुरूवातीला केवळ ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारीवर्गासहीत शाळा उघडण्यात येणार आहेत. पालकांकडून लिखित परवानगी घेतल्यानंतरच शाळेत मुलं दाखल होऊ शकणार आहेत. यासाठी शाळांना मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर अशा उपायांचा अनिवार्य वापर करावा लागणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगही केली जाणार आहे. खुल्या जागेत वर्ग भरणार नाहीत, सोबतच मुलांची बसण्याच्या व्यवस्थेत एकमेकांपासून कमीत कमी ६ फुटांचं अंतर असणं गरजेचं आहे.

​कोरोनामुळे सर्वात प्रभावित झालेल्या महाराष्ट्र राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत उत्तर प्रदेशात अद्याप शाळा उघडण्याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. संक्रमणात वाढ दिसून आपल्यानं २१ सप्टेंबरपासून शाळा उघडणार नाहीत राजधानी दिल्लीत अद्याप शाळा – महाविद्यालये उघडली जाणार नाहीत गुजरात सरकारनं दिवाळीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मध्य प्रदेशमध्ये कामकाजासाठी अंशत: शाळा सुरू केल्या जाणार आहेत. परंतु, वर्ग मात्र आत्ताच सुरू केले जाणार नाहीत पश्चिम बंगालमध्ये आताच शाळा न उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय बिहार सरकारकडून अद्याप स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले नाहीत. मात्र विधानसभा निवडणूक आणि छठ पूजेनंतर शाळा उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. झारखंड सरकारच्या आदेशानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद राहतील छत्तीसगडमध्ये रायपूरसहीत सहा शहरांत लॉकडाऊन सुरू आहे. इतर ठिकाणीही शाळा उघडण्याची शक्यता कमीच आहे राजस्थानातं शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरी राज्यात खासगी शाळांनी मात्र अद्याप शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलंय केरळमध्ये ऑक्टोबरपर्यंत शाळा उघडण्याची योजना आहे कर्नाटक सरकारनं इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यावर बंदी जाहीर केलीय. विद्यार्थी आपल्या शैक्षणिक शंकांचं समाधान मिळवण्यासाठी शाळेत जाऊ शकतात मात्र वर्ग भरवण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही

हरियाणा राज्यात केंद्र सरकारच्या सर्व गाईडलाईन्सच्या पालनासहीत २१ सप्टेंबरपासून शाळा उघडल्या जाणार आहेत आसाममध्येही सोमवारपासून शाळा उघडल्या जाणार आहेत. इथे नववी आणि दहावीचे वर्ग वेगवेगळ्या दिवशी भरतील तसंच अकरावी आणि बारावीचे वर्ग वेगवेगळ्या दिवशी भरवले जाणार आहेत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातही शाळांसाठी गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. इथं सोमवारपासून शाळा उघडल्या जातील हिमाचल प्रदेशांत शाळा उघडण्यासाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय : चंदीगडमध्ये अंशत: शाळा सुरू होतील. परंतु, एका वर्गात केवळ १५ विद्यार्थी असतील
नागालँडमध्येही शाळा सुरू होणार आहेत मेघालयमध्ये सोमवारपासून शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आलीय आंध्र प्रदेशांत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग खबरदारीसह सुरू होणार आहेत


सध्या कन्टेन्मेंट झोन वगळून इतर भागांतील शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. या शाळांमध्येही कन्टेन्मेंट झोन भागात राहणाऱ्या शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कन्टेन्मेंट झोन भागात जाण्याची परवानगी नाही
​शाळा परिसरात वावरताना एकमेकांपासून ६ फुटांचं अंतर पाळणं गरजेचं आहे मास्कचा वापर अनिवार्य आहे हात खराब दिसत नसले तरी वारंवार हात कमीत कमी ४०-६० सेकंद धुणं गरजेचं आहे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे खोकताना, शिंकताना नाका-तोंडाला टिश्यु किंवा रुमालानं हातानं झाकणं गरजेचं आहे

Protected Content