राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊनचे एकनाथ शिंदेंचे सूतोवाच

 

मुंबईः वृत्तसंस्था । राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलीय. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय.

 

राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

 

 

राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय.

 

आज ऑक्सिजन मिळत नाही, आपल्या राज्यात जो ऑक्सिजन उपलब्ध होतोय तो पुरत नाही. इतर राज्यांतून आपण ऑक्सिजन आणतोय. कोरोनाची साखळी तोडायची असल्याने लॉकडाऊनच्या काळात आरोग्य मंत्र्यांनीदेखील अनेक सूचना केल्यात, ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करायचे. हवेतून ऑक्सिजन घेऊन आपण स्वतः ऑक्सिजन तयार करायचे. ऑक्सिजन काँन्सटेटर आपण मागवायचे. 100 मेट्रिक टनचा राज्य सरकारचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असल्यास तोसुद्धा कोविडमध्ये कामी येऊ शकतो. ही चेन ब्रेक करायची असल्यास कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या निर्णय जाहीर करतील. ऑक्सिजनच्या गाडीला ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता असल्यास तोसुद्धा घेण्यात आलाय. त्यामुळे ऑक्सिजनच्या गाड्यांना राज्यांत येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही. लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही. कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

Protected Content