कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी ( व्हिडीओ )

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज फैजपूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन स्थानिक अधिकार्‍यांशी कोरोनाच्या प्रतिकाराबाबत चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी रूग्णांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. कुणाला काहीही असुविधा आढळून आल्यास आपल्याशी थेट संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

शहरात कोरोना रुग्ण संख्यामध्ये हळू हळू वाढ होतांना दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शहरातील कंटेनमेंट झोन असलेल्या भागात जाऊन व फैजपूर कोविड सेंटर ला जाऊन परिस्थितीचा आढावा प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्याकडून घेतला.
कोरोना संसर्गजन्य आजार हा आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर पाय पसरू लागला आहे. यातच आज पोलीस प्रभारी अधिकारी यांची मुलगी व तीन कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव ओगले यांनी शहरात येऊन कंटेनमेंट झोन भागात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लागलीच फैजपूर कोविड सेंटर जाऊन तेथील रुग्णाच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, जे संशयित रुग्ण ऐकत नसतील त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे तसेच कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधांची कमतरता भासता कामा नये. काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे असे आवाहन त्यांनी केले. रूग्ण बरा करावा हे आपले कर्तव्य असून सध्याची परिस्थिती किती दिवस राहील याची कुणालाही कल्पना नाही. म्हणून सर्वांनी आपली व रुग्णाची काळजी घेतली पाहिजे आपल्या खिशातील पैसे खर्च झाले तरी चालतील पण सुविधा कमी पडता कामा नये अशा सूचना दिल्या.

यावेळी प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, यावल तहसिलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसीलदार उषाराणी बहुगुणे, प्रभारी एपीआय राहुल वाघ, फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हान, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, पीएसआय रोहिदास ठोंबरे, फैजपूर सर्कल जे. डी. बंगाळे, तलाठी पी. पी. जावळे, डॉ शहनाज तडवी, डॉ कौस्तुभ तळेले, डॉ राहुल गजरे, डॉ मनीषा महाजन, डॉ सुप्रिया थोरबोले यांच्यासह नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा जिल्हाधिकार्‍यांच्या पाहणीचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2532579253662232

Protected Content