जळगावात डबलसीट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगावात शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १०० हुन अधिक वाहन चालकांवर शुक्रवारी शहर पोलिसांनी धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदरीचे उपाय म्हणून दुचाकीवरून फिरण्याला फक्त चालकास तर कारमधून फिरण्यास तीन व्यक्तींना अनुमती देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात दुचाकीवरून डबल सीट बसण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने शहर पोलिसांनी आज सकाळी अकरा वाजेपासून टॉवर चौकात पोलीस कारवाईला सुरुवात करण्यात आली. दुचाकीवरून सरासपणे डबल सीट वावरत असल्याचा प्रकार समोर दिसला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकीवरून ये जा करणाऱ्या वाहन धारकावर कारवाईचा बडगा पोलिसांनी उहरल्याने दुचाकी धारकांची चांगलीच ताराबळ उडाली. यावेळी 100 हुन अधिक वाहन धारकांना मोटार व्हीकल ऍकट नुसार मेमो देण्यात आला. यावेळी परवाना नसलेल्या चालकानाही मेमो बजावण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई उप निरीक्षक जगदीश मोरे, किशोर निकुंभ, सचिन वाघ, महेंद्र पाटील तसेच कमांडो पथकाने केली.

Protected Content