चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याच्या आरोपाखाली चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,चंदा यांच्या विरोधात आता सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाने कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी नंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

Add Comment

Protected Content