राज्यव्यापी वंध्यत्व निवारण शिबिराचा आजपासून शुभारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन विदगाव अंतर्गत पशुसंवर्धन विभाग जळगाव यांच्या विद्यमाने राज्यव्यापी वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन नांद्रा खुर्द येथे सोमवार, १ डिसेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीअंकित यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेद तडवी, डॉ. सलीम तडवी, डॉ. मनीष बाविस्कर आदी उपस्थित होते. यावेळी पशु प्रजनन शास्त्रज्ञ, व प्रसूती तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांवर उपचार करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जनावरांवरील आजार व त्यांना मिळणारे उपचार या संबंधित पशु पालकांकडून माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन यंत्रणेला सूचना देऊन जनावरांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधी तसेच साधनसामुग्रीचा पुरवठा करण्याच्या सूचना देखील दिल्या.

या कार्यक्रमाला डॉ. राधिका कोळी, डॉ. हेमंत कुमावत,डॉ. निलेश राणे, डॉ. किशोर पाटील, डॉ. गजानन पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. गणेश पाटील, डॉ. अनिता पाटील, राकेश पाटील, परिचर राहुल भोई, सरपंच सुरेखा सोनवणे, वासुदेव सोनवणे, योगेश सोनवणे पोलीस पाटील दिलीप सोनवणे, राजेंद्र सोनवणे, संतोष महाजन, मधुकर सोनवणे यांनी सहकार्य केले.

Protected Content