अपघातग्रस्त रुग्णावर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

चोपडा प्रतिनिधी । अपघातात जखमी झालेल्या रूग्णावर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या टिमसह सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, मार्केट कमेटीचे माजी संचालक, ग. स.चे उपशाखाधिकारी जगन्नाथ टी बाविस्कर हे लग्नकार्याहून परतत असतांना अकुलखेडे नजीक देवीच्या मंदिरासमोरून कुत्रे आडवे आल्यामुळे मोटारसायकल घसरून त्यांचा मोठा अपघात झाला होता. सुदैवाने ते या अपघातातून बचावले.पण  त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर चोपडा येथील डॉ.पाटील हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून डॉ. मोहन टी. पाटील (गोरगांवले बु.)यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव येथील डॉ.कोल्हे अेक्सिडेंट हॉस्पिटल येथे पुढील उपचारार्थ हलवण्यात आले होते. तेथे डॉ. मिलिंद कोल्हे यांनी त्यांच्यावर प्रभावी उपचार करून त्यांच्या हाडांवर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे सफल केली. त्या निमित्ताने जगन्नाथ बाविस्कर यांनी दवाखान्यातून सुटी घेतल्यावेळी डॉ. मिलिंद कोल्हे व त्यांच्या संपुर्ण टिमचा यथोचित सत्कार केला.

याप्रसंगी डॉ. मिलिंद कोल्हे, डॉ. मोहन टी. पाटील, भुलतज्ञ डॉ. बढे , आरोग्यसहाय्यक अमीर, राजू, विलास , सर्व परिचारिका व कर्मचारी तसेच बाविस्कर परिवारातील सर्व सदस्य व मित्र मंडळी हजर होती. शेवटी स्वामी विवेकानंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रेमनाथ बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Protected Content