यावल तालुक्यात लसीकरण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेन्द्रांवरील दहीगाव व कोरपावली येथे आज पुन्हा कोविड लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

बऱ्याच  दिवसापासून यावल शहरासह तालुक्‍यातील अनेक केंद्रांवर लसीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद होती. शुक्रवार रोजी कोविशील्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने ही मोहीम शनिवारी पुन्हा सुरू झाली. परंतु शनिवार रोजी एकाच दिवसात लसीचा साठा संपल्याने पुढील लस साठा येई पर्यंत पुन्हा लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम व या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र  दहिगाव, कोरपावली येथे नागरिकांना गावपातळीवरच लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार कोविड लसीकरणाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी हे करीत आहेत. कोरपावली येथे लसीकरणासाठी केन्द्रावर एकच गर्दी केली होती याप्रसंगी कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते .

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम, उपकेंद्र दहिगाव, व कोरपावली  येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षावरील तरुण-तरुणींनी व नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. तर काही नागरिकांना लस संपल्याने परत जावे लागले.

१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील सावखेडासिम येथे ११०, दहिगाव येथे १२० व कोरपावली येथे १२० असे ३५० नागरिकांना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी दुसऱ्या डोस ला पात्र नागरिकांना प्राधान्य  देण्यात आले.

लसीकरण प्रसंगी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, ग्राम विकास अधिकारी योगेंद्र अहिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, प्रवीण सराफ  समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ. रोशनआरा शेख, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, भूषण पाटील, आरोग्य सेविका अनिता नेहते,  शाबजान तडवी, व प्रतिभा चौधरी, ह्या आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम राबविली.

स्पॉट रजिस्टेशन अरविंद जाधव व भूषण पाटील  यांनी केले. शिबिरास चंद्रकला चौधरी, कल्पना पाटील, आशा सेविका पुष्पा पाटील, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, अर्चना अडकमोल, संध्या बाविस्कर, हिराबाई पांडव, हसीना तडवी, व नजमा तडवी तसेच दहिगाव ग्राम पंचायतचे अरुण पाटील, रवींद्र पाटील  नितीन जैन, विजय पाटील, व सुधाकर पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Protected Content