जिल्हा परिषदेत जळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आढावा सभा

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या सभागृहात आधार नोंदणी बाबत आढावा घेण्यासाठी जळगाव शहरातील प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा मनपा शिक्षण मंडळातर्फे आज सकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. 

प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांच्या सूचनेनुसार या सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यासभेला राजेंद्र सपकाळे,लिपिक  साकिब शेख, संगणक प्रोग्रामर प्रीती सुरंगे, लिपिक सुनील सरोदे, ऑपरेटर सूरज साळुंखे, कैलास तायडे , लिपिक अशोक मदाने उपस्थित होते.  सूत्रसंचलन कैलास तायडे  यांनी केले तर आभार सुनील सरोदे यांनी मानले.

या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी विद्यार्थी आधार नोंदणी, फिट इंडिया योजना, तंबाखू मुक्त शाळा अभियान याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले, तसेच शाळांच्या अडचणीबाबत चर्चा करून अडचणी सोडविण्यात येतील असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे यांनी आरटीइ प्रतिपूर्ती, आरटीइ मान्यता याबाबत मार्गदर्शन केले. उत्कृष्ट आधार नोंदणी  कामाबद्दल मूक बधीर विदयालय, गुरुवर्य प वि पाटील विद्यामंदिर, बी यु एन रायसोनी मराठी प्राथमिक शाळा या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सभेत सत्कार करण्यात आला. मोठया संख्येने मुख्याध्यापक या ऑफलाईन सभेला उपस्थित होते.

 

Protected Content