नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा

 

फैजपूर, प्रतिनिधी । सलून व्यवसायिकास मदत व संरक्षण मिळावे अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने सोशल डीस्टसिंगचा वापर करत पुन:श्च स्मरणपत्र ( निवेदन ) उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहे.

दि. २३ मार्चपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या नाभिकांचा सलून व्यवसाय ठप्प असल्याने समस्त राज्यातील सलून व्यवसायिकांची उपासमार होत आहे, अश्या परिस्थितीत सुद्धा शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाभिकांनी आपला सलून व्यवसाय अगदी तंतोतंत बंद ठेवला आहे. या संदर्भात या अगोदर दि. १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे संरक्षण कीट व शासकीय मदतीची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. परंतु, अद्यापपावेतो या संदर्भात प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही. या निवेदनात तामिळनाडू, दिल्ली सारख्या इतर राज्यांनी सलून व्यवसायाच्या अडचणी समजून घेऊन ज्या प्रमाणे नियमावली घालून व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा परवानगी मिळावी किंवा दरमहा १० हजार रु. मासिक अशी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. सलून व्यवसायिकांचा प्रश्न तातडीने न सोडविल्यास सोमवार दि.८ जून पासून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी फैजपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, जिल्हा संघटक किशोर श्रीखंडे, तालुका प्रतिनिधी प्रवीण हातकर, प्रमोद जगताप, छोटू सनंसे व परिसरातील नाभिक सलून व्यवसायिक उपस्थित होते.

Protected Content