यावल येथे शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात

यावल प्रतिनिधी । येथील विविध पक्षाच्या वतीने हिंदुसुर्य क्षत्रिय गौरव विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची  ४८१ जयंती यावल येथे उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

यावल येथील बाहेरपुरा परिसरात महाराणा प्रतापसिंह चौकात आज रविवार दि.१३ जुन रोजी क्षत्रिय कुल विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार ४८१वी जयंती सर्वपक्षीय कार्यकर्त व पदाधिकारी तथा समाज बांधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले यावल चे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहुन अभीवादन केले . यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेश गजरे , विरेन्द्रसिंह सिसोदीया, प्रदीप पाटील , आंबालालसिंह राजपुत, मंजुर खान आदी समाज बांधव व ईतर सामाजीक कार्यकर्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार समाजाच्या वतीने विरेन्द्रसिंह  सिसोदीया यांनी मानले.

 

Protected Content