जळगावातील शाहूनगरात दोघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गुटख्याची पुडी व दारू जादा भावाने देत असल्याच्या कारणावरून दोघांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगर शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शाहुनगरातील अमीर पान सेंटरजवळील ओट्याजवळ शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इम्रान मुल्ला रा. शाहु नगर हा हरून सैय्यद गफ्फार यांच्याकडे विमलची पुडी आणि पुड्या व दारू घेण्यासाठी ५०० रूपये मागितले. मात्र सकाळी आपण ही दारूची बाटली १०० रूपयाला घेतली असे बोलताच संशयित आरोपी हरून गफ्फार याच्यासह अमीर सैय्यद दगडू, सैय्यद गफ्फार, सैय्यद सौप्पो सैय्यद गफ्फार सर्व रा. शाहु नगर यांच्यात वाद झाला तर चौघांनी इम्रान मुल्ला या शिवीगाळ करून मारहाण केली. भाचा इम्रान मुल्ला याला मारहाण करीत असल्याची माहिती मामा सल्लाउद्दीन शेख कुदोबुद्दीन (वय-४०) रा. शाहू नगर मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. चौघांना सल्लाउद्दीन शेख हे समजविण्याच्या प्रयत्नात असतांना संशयित आरोपी अमीर दगडू याने ‘साले तुम जादा मात गये हो’ अशी शिवीगाळ करून लोखंडी पाईन डोक्याला तर सैय्यद गफ्फार याने काठीने मारहाण करून जखमी केले. जखमीवस्थेत गोदावरी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सल्लाउद्दीन शेख कुदोबुद्दीन यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हरून गफ्फार, अमीर सैय्यद दगडू, सैय्यद गफ्फार, सैय्यद सौप्पो सैय्यद गफ्फार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content