जिल्ह्यातील एका संशयीत व्यक्तीचा अहवाल ‘निगेटीव्ह’

बुलडाणा, प्रतिनिधी । कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. बुलडाणा येथील कक्षामध्ये दाखल दोन संशयीत व्यक्तीपैंकी एकाचा नागपूर येथील प्रयोगशाळेतून आलेला अहवाल निगेटीव्ह आला आहे.

घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. २३ मार्चपर्यंत विदेशातून आलेल्या ५६ भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि.२४ मार्च रोजी १ नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ५७ नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल नागरिकाचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयीताच्या रिपोर्ट निगेटीव्ह आला असून अन्य एकाचा नमुना नागपूरला पाठविलेला आहे. जिल्हयात आतापर्यंत ७७ विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या २ नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर ९ नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून ३ व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून २ नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.

Protected Content