सामाजिक साप्ताह अंतर्गत विविध उपक्रम संपन्न

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग यांच्यामार्फत सामाजिक समता सप्ताह दि. ६ ते १४ एप्रिल या कालावधीत राबविण्यात आला. या सप्ताहाचा समारोप जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते जात प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला.

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत दि. १२ एप्रिल रोजी जिल्हयातील महाविदयालयाचे प्राचार्य, संबंधित लिपीक व विदयार्थी यांचे वेबिनारसुध्दा आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये मुख्यता विद्यार्थ्यांना जात पडताळणी अर्ज भरतांना येणाऱ्या प्रमुख अडचणी, त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दि. १४ एप्रिल, रोजी जिल्हा नियोजन भवन, येथे प्रतिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या सप्तहात जात प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्यानुंषगिक माहिती संदर्भात विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कार्यक्रम राबविण्यात आले.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सोपे व्हावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वेळेत प्रमाणपत्र मिळावे जेणेकरुन त्यांचे भविष्यात नुकसान होणार नाही हा या सप्ताहाचा प्रमुख उ्ददेश आहे. या सामाजि‍क सप्ताहात तालुका स्तरावरील संबंधित महाविदयालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सोपे व्हावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वेळेत प्रमाणपत्र मिळावे जेणेकरुन त्यांचे भविष्यात नुकसान होणार नाही हा या सप्ताहाचा प्रमुख उ्ददेश आहे. या सामाजि‍क सप्ताहात तालुका स्तरावरील संबंधित महाविदयालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सप्ताहामध्ये विशेष बाब म्हणून तपासणी करुन १२३७ इतके अर्ज वैध ठरविण्यात आले. मागील ५ महिन्यात १५ हजार वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन निर्गमित करण्यात आले.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन करण्यात आले आहे की, इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विदयार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विदयार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विदयार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विदयार्थ्यानी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे दिनांक ३० एप्रिल,२२ पर्यत सादर करावीत. अर्जामध्ये आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन विदयार्थ्याना त्यांचे प्रकरण वैध झाल्याचा SMS मिळेल आणि जर काही त्रृटी असल्यास त्याबाबतची सुध्दा माहिती वेळीच ई-मेलवर प्राप्त होईल. तसेच प्रकरण ऑनलाईन सादर केल्यानंतर हार्डकॉपी १५ दिवसांचे आंत समिती कार्यालयास सादर करावी, असे बी. यु. खरे संशोधन अधिकारी तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content