वाहनाचे नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून तरूणाला धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात वाहनाचे नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून तरूणाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वाहनचालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिध्दार्थ नारायण शिरसाठ (वय-२८) रा. धानोरा ता.चोपडा जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सिध्दार्थ हा त्यांच्या दुचाकीने जळगाव शहरातील नेहरू पुतळा येथील आयुष हॉस्पिटलसमोरून जात होता. त्यावेळी एकाने त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत सिध्दार्थच्या दुचाकीचे नुकसान झाले. दरम्यान दुचाकीचे झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी कारचालक राहूल धांडे यांना केली. याचा राग असल्याने ‘तुझ्या गाडीचे नुकसान भरपाई देणार नाही, तुला काय करायचे आहे करून घे’ अशी धमकी दिली. यानंतर सिध्दार्थने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायकाळी ६ वाजता राहूल सुरेश धांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील करीत आहे.

Protected Content