डांभुर्णीत शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३वी जयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती डांभुर्णीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने डांभुर्णी गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि पुतळयाच माल्यार्पण करून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते मनोभावे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय श्याम भाऊ सोनवणे, मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शिवश्री रामदादा पवार, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, डांभुर्णी गावच्या सरपंच सौ.कल्पना बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिवजयंती कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप.बोरुडे तसेच स्वयंदीप प्रतिष्ठानचे सचिव व जिल्हा बाल कल्याण समितीचे सदस्य संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

प्रसंगी डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्य शुभम विसवे, रेखाताई कोळी, देवानंद फालक, गावचे प्रतिष्ठित शेतकरी रामचंद्र चौधरी, जितेंद्र चौधरी, अनिल साठे, गजानन सोनवणे, अरविंद बाविस्कर, गिरीश विसवे, दिनेश पवार, विलास भालेराव, दिवाकर पाटील, संजय खर्चे, संजय पाटील, प्रफुल्ल वाणी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content