भुसावळात फरार आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

WhatsApp Image 2019 11 26 at 10.44.22

भुसावळ, प्रतिनिधी | येथील बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील आरोपी दहा दिवसांपूर्वी फरार झाला होता. त्यास बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

शिरपूर कन्हाळा नारायण नगर येथील रहिवासी आकाश गणेश पाटील ( वय-२२) याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आकाश हा फरार झाला होता. त्यास त्याच्या घरातून सोमवार २५ नोव्हेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी क्र. एम.एच. १९ डी.जे. ०७४२ हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने केली. पथकात पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे पो.कॉ.कृष्णा देशमुख ,उमाकांत पाटील ,प्रशांत परदेशी,तुषार पाटील यांचा समावेश होता.

Protected Content