जमियात उलमा ई हिंदतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन

बोदवड प्रतिनिधी । महाराष्ट्रातील महाड, चिपडुन, कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला होता. अनेक वस्त्या नष्ट झाल्या आहेत आणि लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी जमियात उलमा ई हिंद बोदवड यांनी या पूरग्रस्तांसाठी छोटी मदत म्हणून निधी संकलित केला आहे.

शुक्रवारी नमाज पठणानंतर मौलवी अमीन पटेल यांच्या सांगण्यावरून हा निधी संकलित करण्यात आला त्यात जामा मशिद ६७५०, दर्गा जवळील मशीद ४२६६, मदिना मशिद मन्यार मोहल्ला २३००, मशिद ए इब्रहिम बागवान मोहल्‍ला २५६५, सिद्दीकी या मशिद ३९००, मदिना मशिद १०२१, असे एकूण २०,८०२ रुपये मदत निधी म्हणून संकलित करण्यात आला. हा निधी जमियात उलमा ई हिंद बोदवड कडून थेट महाड चीपळून कोल्हापूर सांगली अशा पूरग्रस्त भागांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा भागातील नागरिकांना ही मदत पोहोचविली जाईल.

 

Protected Content