सदावर्तेंच्या घरात नोटा मोजण्याचं मशीन – कर्मचाऱ्यांच्या पैशातून स्वतःसाठी खरेदी केल्याचा दावा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत जे पैसे सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतले यातून भायखळा आणि परळमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलीसांनी कोर्टात व्यक्त केला असून गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये २५० डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे.

याविषयी बोलतांना प्रदीप घरत म्हणाले की, सदावर्ते यांनी भायखळा तसेच परळमध्ये त्यांनी प्रॉपर्टी आणि गाडीदेखील घेतली असून ते याच पैशातून घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी सदावर्ते यांची पोलीस कोठडी पाहिजे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि काही संशयास्पद कागदपत्र आणि वहीसुद्धा मिळाली असून सदावर्ते यांनी ॲफिडेव्हिटसाठी फॉर्म बनवला होता.

२७० ॲफिडेव्हिटसाठी आणि १५ रुपये तिकीटासाठी घेतले आहे.  मात्र इतर पैसे लोकांना परत केले नाहीत. हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये पैसे २५० डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख आहे. सोबतच पैसे मोजण्याच्या मशीनमधून ८५ लाख रुपये मोजले आहेत. OLX वर जाहिरात पाहून सदावर्ते यांनी मोहम्मद रफी नावाच्या इसमाला संपर्क केला होता आणि त्यानंतर आठवड्याभरातच त्याच्याकडून केरळवरुन आरटीजीएसनं २३ लाख रुपये देत एक आलिशान गाडी खरेदी केली. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

 

Protected Content