गावठी बॉम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न

 

 

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था ।  गावठी बाँम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जयसिंगपूर शहरात घडला आहे. या  घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा गावठी बॉम्ब निकामी केला आहे.

 

जयसिंगूर शहरात  रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी अज्ञाताने रुग्णालयाच्या परिसरात गावठी बॉम्ब प्लान्ट केला होता. याच परिसरात विस्फोटासाठी लागणारं पुरक साहित्य दोन दिवसांपासून एका गोणीमध्ये पडून होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना सूत्र हालवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी गावठी बॉम्ब निकामी केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

 

जयसिंगपूरसारख्या शहरात गावठी बॉम्बच्या मदतीने थेट रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी  तपास सुरु केला असून तापसातून लवकरच  निगडीत बाबी समोर येतील असे सांगितले जात आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी 19 मार्च रोजी जप्त केल्या होत्या. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले होते. जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता, याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही.  पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून एक आरोपी फरार आहे.

Protected Content