“पंतप्रधान मौन का ?” – पत्रावर १३ विरोधकांची सही; ठाकरेंची मात्र नाही  

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । “देशातील वाढत्या हिंसाचारांच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का बोलत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत त्याविषयी प्रमुख १३ पक्षांच्या नेत्यांनी एक पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची यांनी मात्र या पत्रावर सही नसल्याने हिंदू मतं दुरावण्याच्या भीतीनं त्यांनी सही केली नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

१३ विरोधकांनी एक पत्र लिहिलं असून देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत अशा आशयाचा प्रश्न विचारला आहे. पंतप्रधानांच्या मौनामुळे हिंसाचार पसरवणाऱ्यांना संरक्षण मिळत आहे असा आरोपही या पत्रातून केला आहे.

पत्रावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सह्या आहेत. या पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही करावी यासाठी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी तब्बल सहा तास वाट पाहिली मात्र त्यानी यावर सही केली नाही.

Protected Content