पहूर येथे टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत गाय गंभीर जखमी

पहुर, ता.जामनेर – – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर रोडवर पहूर बस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत गाय गंभीर झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  “पहूर बस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर जामनेर रोडलगत विजय कापड दुकानच्या समोर जामनेरकडून औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्रमांक MH 08 E 9168) या गाडीने रस्त्याने जाणाऱ्या गाईस जोरदार धडक दिल्याने गाय गंभीररीत्या जखमी झाली आहे. सदर गाय गंभीर जखमी अवस्थेत असून गाईला उभेही राहता येत नाही.

 

Protected Content