जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण भागातील श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला.
सुरुवातीला मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सपत्नीक दिंडीची व प्रतिमेची पूजा केली. यानंतर परिसरात दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेतले. प्रसंगी विठूनामाचा गजर करीत टाळ वाजवीत भक्तिमय वातावरण केले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.