जिल्ह्यात कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या १२ हजारांच्या पार; आज ५६५ नवीन बाधीत

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोना विषाणूवर मात करणार्‍या रूग्णांची संख्या १२ हजाराच्या पार गेली आहे. दुसरीकडे आज जिल्ह्यात एकूण ५६५ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टच्या आधारे जिल्हा माहिती कार्यालयाने अपडेट जारी केले आहेत. यानुसार आज जिल्ह्यातू एकूण ५६५ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १३८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल अमळनेर-५९ व चोपडा-५८ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-३८; भुसावळ-२६; पाचोरा-५; भडगाव-५०; धरणगाव-२९; यावल-१९; एरंडोल-२९; जामनेर-११; रावेर-६; पारोळा-३२; चाळीसगाव-३८; मुक्ताईनगर-१३; बोदवड-३ व बाहेरच्या जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज ३७३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्‍या रूग्णांचा आकडा १२ हजारांच्या पार गेला आहे. आज दिवस अखेरीस एकूण १२१०१ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात तीन मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या ६५० इतकी झाली आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content