प्रा.एस.एफ.पाटील यांच्या नावे सुवर्ण पदक देण्यासाठी चार लाखांची देणगी

north maharashtra university

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून रसायनशास्त्राच्या सर्व शाखांमधून एम.एस्सी. मध्ये प्रथम येणाऱ्यास तसेच विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माजी कुलगुरु प्रा.एस.एफ.पाटील सुर्वण पदक प्रदान करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी चार लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.एस.एफ.पाटील यांचे रसायशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासमंडळ सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक यांनी एकत्रित करून चार लाख रूपयांचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला. संलग्नित महाविद्यालयातून रसायनशास्त्राच्या सर्व शाखांमधून एम.एस्सी.मध्ये प्रथम आणि विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेतून सर्व शाखांमधून एम.एस्सी. मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस हे सुवर्ण पदक दिले जाणार आहे. धनादेश सुपूर्द करतांना प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, प्राचार्य एस.एन.पटेल उपस्थित होते.

धनादेश देण्याचा यांचा वाटा
प्रा.एस.एफ.पाटील यांचे विद्यार्थी व अभ्यासमंडळ सदस्यामध्ये प्रा.यु.आर.कापडी, प्रा.सुगंधा पाटील, प्रा.डी.जी.हुंडिवाले, माधव पाटील, प्रा.नगिन पाटील, प्रा.नरोत्तम पाटील, प्रा.सुरेश पाटील, डॉ.मिलींद पाटील, डॉ.सुनील पाटील, डॉ. यु.एन.जाधव, डॉ. डी.एम.पाटील, डॉ.व्ही.व्ही गीते, डॉ.जगदीश पाटील, प्रा.निलीमा राजूरकर, राजेंद्र पाटील, मिलींद पाटील, जे.पी.महाशब्दे, डॉ.ए.एम.नेमाडे, डॉ.एच.ए.महाजन, प्रा.एस.एस.राजपूत, अभिजित पाटील, डॉ.महेश देसाई, डॉ.एस.एन.पटेल यांचा समावेश आहे.

Protected Content