धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरूणाचा हरीविठ्ठल नगरजवळ रेल्वेरूळ ओलांडतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने उपचारापुर्वीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक भगवान महाजन वय-३१ रा. समता नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, दिपक महाजन हा आपल्या परिवारासह समता नगरात वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दिपक महाजन हा हरीविठ्ठल नगरातील रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्याला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस कर्मचारी अनिंद्र नगराळे आणि देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Protected Content