घरकूल घोटाळा : चौघांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | घरकूल घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघा तत्कालीन नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे.

तत्कालीन नगरपालिकेतील घरकूल घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला होता. यात माजी आमदार, नगराध्यक्षांसह ४३ आजी-माजी नगरसेवकांना धुळे विशेष सत्र न्यावालयाने ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दोषी ठरवले होते. तर याच प्रकरणात सुरेशदादा जैन आणि इतरांना कारागृहात जावे लागले होते. ही शिक्षा सुनावण्याच्या आधीच म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या मनपाच्या सावीत्रिक निवडणुकीत भाजप कडून निवडणूक लढवून भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे विजयी झाले होते. तसेच कैलास सोनवणे यांना स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, घरकुल घोटाळ्यात न्यायाल्याने शिक्षा ठोठावल्याने चारही नगरसेवकांना अपात्र करावे यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आल होता. यात न्यायालयाने या चौघांना अपात्र करण्याचे निर्देश दिले होते. या निकालानंतर संबंधीतांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशीव ढेकळे आणि लताताई भोईटे या चौघांना सहा वर्षांसाठी अपात्र केले आहे. ही अपात्रता ऑगस्ट २०१९ पासून धरली जाणार आहे. यामुळे अर्थातच ऑगस्ट २०२५ पर्यंत हे चौघे जण निवडणूक लढवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. याआधी महापालिकेची निवडणूक झाल्यास त्यांना घरातील दुसर्‍या सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.

Protected Content