‘गोदावरी-पेस’चा प्रेषित वारके जेईई मेन्समध्ये जिल्ह्यात पहिला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मार्च २०२४ मध्ये झालेल्या जेईई मेन्स एक्झाम २ मध्ये प्रेषित प्रशांत वारके हा ९९.६४ पर्सेंटाइल मिळवून परत एकदा जिल्ह्यात पहिला आला आहे.

प्रेषित प्रशांत वारके या विद्यार्थ्याने यशाचा डबलबार साजरा केला आहे. जानेवारी मध्ये झालेल्या पहिल्या जेईई मेन्स एक्झाम-१ मध्ये सुध्दा तो ९९.४७ पर्सेंटाइल मिळवून जिल्ह्यात पहिला आला होता. यानंतर त्याने जेईई मेन्स एक्झाम-२ मध्ये देखील ९९.६४ पर्सेंटाइल मिळवून आधीचे यश रिपीट केला आहे. त्याची ऑल इंडिया मेरिट रँक १२४८ असून देशभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात त्यामधून त्याने हे यश मिळविले आहे.

जळगांव मध्ये राहून आयआयटीला नंबर लागत नाही त्यासाठी मोठ्या शहरात व मोठे कोचींग करावे लागतात हा समज प्रेषीत वारके या विद्यार्थ्याने खोटा ठरवला आहे. तो गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव चा विद्यार्थी असून त्याने आयआयटी साठी पेस अकॅडमी जैष्णू गुरुकुल जळगावचे मार्गदर्शन घेतले आहे.

प्रेषीत हा गोदावरी फाऊंडेशन आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके व एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे गोदावरीआई पाटील, सुभाषदादा पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. वर्षाताई पाटील, डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील आदींसह गोदावरी परिवारातील सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content