शेतात काम करत असलेल्या पाच जणांना विषबाधा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील जळके-पळासखेडे शिवारात शेतात काम करत असलेल्या पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना आज रविवार, दि. ३ एप्रिल रोजी दुपारी घडली असून या पाचही जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘जळगाव तालुक्यातील जळके पळासखेडे शिवारात असलेल्या शेतात कापूस वेचण्यासाठी २० ते २५ मजूर रविवारी ३ एप्रिल रोजी सकाळी गेले होते. सकाळी मजुर काम करून दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेवणासाठी झाडाखाली बसले जेवण करून विहिरीतले पाणी प्यायले.

त्यानंतर इतर मजुरांपैकी कृष्णा रवींद्र सोनवणे वय- ५, लक्ष्मा रवींद्र सोनवणे वय- ६, ममता रवींद्र सोनवणे वय १२, सोनाली रामकृष्ण पवार वय १७, कविता रामकृष्ण पवार वय १५ या पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना उलट्या व चक्कर येऊ लागले. यानंतर शेतातील काम करणाऱ्या इतर मजुरांनी तातडीने त्यांना खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी ४ वाजता दाखल केले. यातील कविता राम कृष्ण पवार तिची प्रकृती चिंताजनक आहे, पाच जणांवर उपचार सुरू आहे.

Protected Content