ब्रेकिंग : सकाळी ७ ते ११ भाजी मार्केट सुरु, पण एकट्यालाच जाण्याची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या आरोग्याच्या हितासाठीच घेतले आहेत. परंतू अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भाजीपाला मिळेल परंतु त्याठिकाणी गर्दी करु नका. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेवढ्या वेळेतच लोकांनी भाजी खरेदी करावी आणि आपापल्या घरी जावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

 

 

संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या आरोग्याच्या हितासाठीच घेतले आहेत. पण आणखी कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. सकाळी ७ ते ११ भाजी मार्केट सुरु राहणार आहे, मात्र एकट्यानेच जा, अशी तंबीही त्यांनी दिली आहे. तसेच व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबरोबर मी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव यांनी चर्चा केली आहे. राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येईल, असेदेखील अजित पवारांनी सांगितले.

Protected Content