यावल येथे नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध; शिवसेनेतर्फे राणेंच्या पुतळ्याचे दहन(व्हिडिओ)

यावल अय्युब पटेल । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा यावल शहरात शिवसेनातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते भुसावळ टी पॉईंट पर्यंत नारायण राणे यांच्या पुतळ्याची आज मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अवमान केल्याचे प्रकरण आता प्रचंड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.  आता विविध शिवसेना नेत्यांनी राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज मंगळवार २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता नारायण राणे यांची प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे मिरवणूक थांबून पुतळ्याला काळे फासून दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, कडू पाटील, गोटू सोनवणे, शरद कोळी, पप्पू जोशी, संतोश धोबी, किरण बारी, सागर देवांग, योगेश पाटील, योगेश राजपूत, हुसैन तडवी, विजय पंडीत, पिंटू कुंभार, सागर बोरसे,  निलेश पराशर, नाना पाटील, आर.के.चौधरी, कडू पाटील आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/369377394769058

 

Protected Content