भाजपला खिंडार : महापालिकेचे ४ नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील भाजपाचे चार नगरसेवक यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जळगाव महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून पक्ष प्रवेशावरून अनेक ठिकाणी राजकारण सुरू आहे.  महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

शुक्रवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, ऍड.दिलीप पोकळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.

 

Protected Content