ब्रेकींग : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती लपविल्याच्या आरोपातून दाखल झालेल्या खटल्यात आज त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने खळबख उडाली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

न्यायालयात हा खटला चालल्यानंतर आज याचा निकाल सुनावण्यात आला. यात   बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.  चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला.

 

 

Protected Content