तरुणाईला जीवनात चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे – डॉ. माहुलीकर

WhatsApp Image 2020 01 12 at 6.40.16 PM

जळगाव,प्रतिनिधी | तरुणाईला जीवनात नाक, कान, डोळे जागृत ठेवून चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे. त्यासाठी सद्सद्विवेक बुद्धीने तरुणांनी जगावे. जोडीदाराची निवड करताना पुरेसा वेळ देणे देखील महत्वाचे आहे. संस्कार जतन ठेवत सामाजिक बांधिलकी तरुणांनी जोपासावी, असे प्रतीपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय येथे ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदे’चे जळगावात उद्घाटन झाले. अभियानाचा समारोप कोल्हापूर येथे १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी परिषदेचे उद्घाटक म्हणून प्र-कुलगुरू डॉ. माहुलीकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे(नाशिक), राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, परेश शहा (शिंदखेडा), विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस.कट्यारे हे उपस्थित होते.  डॉ. गोराणे, डॉ. लोहार, डॉ. साळवे यांनी मनोगते व्यक्त केले. उद्घाटन जोडीदाराची निवड करताना कोणत्या बाबी अपेक्षित असतात त्यांचे स्टीकर काढून मान्यवरांनी केले. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले की, तरुणांना वैचारिक पातळीवर सक्षम करण्यासाठी जोडीदाराची विवेकी निवड अभियान महत्वाची भूमिका बजावत आहे. सूत्रसंचालन सह कार्यवाह सचिन थिटे यांनी तर आभार जितेंद्र धनगर यांनी मानले.  दुपारील सत्रात रूढी परंपरांना फाटा देऊन संघर्षमयी पद्धतीने विवाह करणाऱ्या तीन जोडप्यांची मुलाखत कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात यांनी घेतली. यात जळगाव येथील विश्वजीत चौधरी-मिनाक्षी कांबळे, जामनेर तालुक्यातील नेरी येथील आशिष दामोदर-कांचन सोनवणे, औरंगाबाद येथील दीक्षा काळे -आनंद कन्नुर यांचा समावेश होता. सहजीवन म्हणजे सुसंवाद अशी सोपी व्याख्या विश्वजीत चौधरी यांनी सांगितली. सत्राचे सूत्रसंचालन कल्पना चौधरी तर आभार डी. आर. कोतकर यांनी मानले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर आभार विजय लुल्हे यांनी मानले. जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी गौरव अळणे, जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, अशफाक पिंजारी, विजय लुल्हे, मंजूर पिंजारी, संदीप कुमावत, सायली चौधरी, आर. वाय. चौधरी, दिलीप पाटील, शिरीष चौधरी, हमीद बारेला, कडू पाटील, प्रवीण नागपुरे, गुरुप्रसाद पाटील, पिरन अनुष्ठान, प्रकाश तामसवरे तसेच प्राचार्य डॉ.अनिल लोहार व समन्वयक डॉ. खेमराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content