जिल्हा माध्यमिक पतसंस्थेत गैरव्यवहाराचा आरोप : चौकशीची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव या संस्थेची २६ सप्टेंबर रोजी नियोजित  वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करा, पतपेढीच्या  गैरव्यवहाराची चौकशी करा व पतपेढीचे लिपिक रवींद्र अर्जुन मोरे यांना न्याय मिळावा अशी मागणी माध्यमिक शिक्षक पतपेढी बचाव समितीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला.

 

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी जिल्हा माध्यमिक पतपेढीमध्ये  रवींद्र मोरे यांना डावलून चुकीच्या पद्धतीने प्रभावती कोल्हे पदोन्नती देण्यात आलेली आहे. श्री.  मोरे यांना कार्यलयात कर्मचाऱ्यांकडून त्रास होता,या त्रासाविरोधात त्यांनी कर्मचाऱ्यांची तक्रार उप निबंधक यांच्याकडे केली होती. याचा राग कर्मचारी व पतपेढी अध्यक्षांना आल्याने त्यांनी चौकशी समिती नेमली असा आरोप समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांनी  केला.  श्री,  शिरसाट पुढे म्हणाले की,  या चौकशी समितीत ज्यांच्यावर श्री. मोरे यांनी आरोप केले आहेत त्यांचीच नियुक्ती करण्यात आल्याने या समितीच्या वैधते बाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, या चौकशीत दोघ सदस्यांनी अनुकूल अहवाल देवून देखील श्री. मोरे यांना बडतर्फ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला. पतपेढीत  २०१८ मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी सह निबंधकांनी आपल्या स्तरावर करावी. २०२० काळात नोकर भरती बंद असतांना दोघा कर्मचाऱ्यांना कसे घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की,  जिल्हा माध्यमिक पतपेढीमध्ये रवींद्र मोरे नावाचे अनुसूचित जातीचे लिपिक या पदावर मागील ३० वर्षांपासून कार्यरत आहेत.  या दीर्घकालीन सेवेनंतर त्यांचा पदोन्नतीसाठी नंबर होता. पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड यांच्याकडे वारंवार पदोन्नती देण्याची मागणी केली आहे. हीबाब पतपेढीचे अध्यक्ष श्री. भिरूड यांना सहन झाली नाही व त्यांनी जातीय आकसापोटी मोरे यांना निलंबित केले. मागील ११ महिन्यांपासून रवींद्र मोरे हे निलंबित आहेत. निलंबनानंतर श्री. मोरे यांनी पतपेढी अध्यक्ष व संचालक मंडळाकडे त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी वारंवार विनंती  केली.  मात्र, त्यांना पुन्हा कामावर न घेता बडतर्फ करण्यात आले आहे.  अध्यक्ष व संचालक मंडळ यांची ही कृती मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कृती आहे.या अन्यायकारक कृतीचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने धिक्कार करण्यात आला. रवींद्र मोरे यांना पतपेढीच्या अध्यक्षांनी तातडीने कामावर घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी  करण्यात आली.  याप्रसंती बामसेफ खान्देश प्रभारी सुमित्र आहिरे, भारत मुक्ती मोर्चाचे सुरेश सपकाळे, राजेंद्र चित्ते, रवींद्र वाडे आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/555038889067539

 

Protected Content