जामनेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत (व्हिडीओ)

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील देवपिंपरी सह परिसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

जामनेर तालुक्यातील देवपिंपरी सह परिसरातील जवळपास पावणेदोनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मुक्ताईनगर येथील खडसे फार्म येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील व जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले

याप्रसंगी एडवोकेट रवींद्र पाटील म्हणाले की आता फक्त जामनेरच नव्हे तर जिल्हाभरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कल वाढणार असून यातून पक्ष सशक्त होणार आहे एकनाथराव खडसे यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1030201374073637/

Protected Content