शिवाजी महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसविणार ; कर्नाटक प्रशासनाकडून आश्वासन

बेळगाव (वृत्तसंस्था) जर ८ दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यावर ८ दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

 

बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला होता. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दरम्यान, ज्या गावात पुतळा हटवला त्या मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.

Protected Content