Home Cities जळगाव सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन


SNAIMAGE78683lokshahi Din
 

जळगाव (प्रतिनिधी) जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी, 4 नोव्हेंबर, 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून आपले तक्रारी अर्ज सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित लोकशाही दिनात सादर करावेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound