अमळनेर येथे मोफत मेमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन 

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील मंगळग्रह सेवा संस्था,लायन्स क्लब व मानिनी फाउंडेशन ( पुणे ) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ७ डिसेंबर २०२२ रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे एक हजार एक महिलांच्या मोफत मेमोग्राफी टेस्ट ( ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरार्थींना ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉ. रोहन पाटील मोफत मार्गदर्शनही करणार आहेत. शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी जात, धर्म व उत्पन्नाची अट नसेल. मात्र त्यांनी दिनांक एक ते तीन डिसेंबर या दरम्यान श्री मंगळग्रह मंदिर येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. शिबिरात ऐनवेळी येणाऱ्यांना लाभ मिळेलच याची खात्री देता येणार नाही. कोणीही फोनवर संपर्क साधू नये. सर्वांनी मंदिरात समक्ष जाऊनच संपर्क करावा , असे मंगळग्रह सेवा संस्था,लायन्स क्लब व मानिनी फाउंडेशनच्या संस्थापिका – अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content