अमळनेरात राष्ट्रीय विचार प्रबोधन व्याख्यानमाला उत्साहात 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “महात्मा फुले यांची आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.१९० वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांना लोकांच्या हृदयात घेऊन जायचं काम सर्वप्रथम फुल्यांनी केलं.”असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जयसिंग वाघ यांनी युवा कल्याण प्रतिष्ठाण आयोजित राष्ट्रीय विचार प्रबोधन व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून केले.

महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रातांत त्यांची जयंती साजरी करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. त्यांनी राजसत्तेसह धर्मसत्तेच्या अनिष्ट प्रथा विरुद्ध दंड थोपटले आणि देशात सर्वप्रथम महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे आज महिला समोर विकासाच्या प्रवाहात पुढे दिसताहेत असेही वाघ यांनी अमळनेर येथील माळीवाडा परिसरातील त्रिमूर्ती चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत सांगितले.

सदर कार्यक्रम महात्मा फुले स्मृतिदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचे एक सामाजिक उपक्रम राबवित प्रायोजकत्व केले. याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन यांनी म. फुलेंच्या कार्याचा आढावा घेत इतिहासात फुले यांच्या शिवकार्याचे श्रेय दुसऱ्यांनी घेतल्याचा घणाघात केला.

समारोप भाषणात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी फुले यांनी संधी उपलब्ध करून दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येते हे तत्व बहुजन समाजासाठी आपल्या कार्यातून मांडले असे सांगितले. प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी केले. सूत्रसंचालन धीरज महाजन यांनी केले. आभार मासिक माळीभूषण चे संपादक प्रा भिमराव महाजन यांनी व्यक्त केले.

 कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी. माळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर होते. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग नामदेव महाराज,गंगाराम निंबा महाजन, बापू झुलाल पाटील ,ऍड सुरेश सोनवणे, भाईदास सुखदेव महाजन, प्रताप बाबुलाल महाजन, श्रीमती रुखमाबाई पुंडलिक महाजन,रत्नमाला साखरलाल महाजन, अनिल मधुकर महाजन, मनोहर दयाराम महाजन, गणेश पांडुरंग महाजन, अडव्हॉकेट सुदाम श्रावण महाजन,योगेश रघुनाथ महाजन, कैलास गजानन महाजन,तुलशिराम महाजन, मनोज शिंगाणे आदी स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

तसेच उपस्थित श्रोत्यांमध्ये विशेष उपस्थित असलेले अशोक महाजन , प्रा,सुभाष महाजन, अभियान संदीप घोरपड़े, गौतम मोरे,ऍड तिलोत्तमा पाटील, अशोक बिऱ्हाड़े, प्रा विश्वास पाटील,मधुकर महाजन, गुणवंत पवार, प्रा डॉ राहुल निकम, सोपान भवरे, गोकुळ बागुल, बन्सीलाल भागवत,डी ए सोनवणे, वाल्मिक मराठे, योगेश पाटील, पत्रकार अजय भामरे, ईश्वर महाजन, देवदत्त संदानशिव, हमीद गुरुजी, प्रा विजय वाघमारे, गिरिश पाटील, अशोक मिस्तरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल महाजन, दिपक महाजन,भरत सुतार, सुनिल सोमा महाजन, योगेश शांताराम महाजन,महिला मंडळाच्या उपाध्यक्षा रंजना महाजन,सचिव भारती चव्हाण, मनिषा महाजन आदिसह क्षत्रिय कांचमळी समाज पंच मंडळ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,त्रिमूर्ती युवा झाज पथक आदिंनी परिश्रम घेतले.

Protected Content