पारोळ्यातील तीघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन : शहरावर शोककळा

पारोळा, प्रतिनिधी । शहरातील शिक्षक , गव्हरमेंट कॉन्टॅक्टर , आणि सामाजिक कार्यकर्ते अश्या तिघा जणांचा दिनांक २४ रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे .

येथील श्रीनाथजी नगर येथील रहिवाशी व जळगाव जिल्हा मजुर फेडरेशनचे माजी सभापती तथा गव्हरमेंट कॉन्टॅक्टर हेमराज मुरलीधर बाविस्कर ( विचखेडेकर ) यांचे दिनांक २४ रोजी पहाटे ४ वाजून २५मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुलं , सुना , नातवंडे , २ भाऊ असा परिवार आहे.

तसेच शिवकॉलनीतील रहिवाशी व आरपीआय कार्यकर्ते जिल्हयासह तालुक्यात सुपरिचित असलेले पैजवन उर्फे पुंजू बिऱ्हाडे यांचे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुली , १ मुलगा असा परिवार आहे.

तर शिंदे गल्लीतील रहिवाशी देसले नाना यांचे चिरंजीव व माध्यमिक विद्यालय दोधवद ता . अमळनेर येथील उपशिक्षक , देशमुख नगर पिंपरी रोड अमळनेर येथे रहिवाशी असलेले प्रशांत भाऊराव देसले ( ४४ ) हे मॉर्निंग वॉक साठी गेले असतांना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराच्या तीव्र धक्का बसला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुली , भाऊ , असा परिवार आहे . दरम्यान हया तीघांच्या निधनाने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शहरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content