जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवर एल.एच. स्कूलच्या मागे असणार्या जंगलात रात्री उशीरा वणवा भडकला असून यात मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
शिरसोली रस्त्यावरील उजाड कुसुंबा गावाच्या शिवारातील एलएच पाटील स्कूलच्या मागील जंगलात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आगीचा वणवा पेटला. दोन टेकड्यांच्या मागील माळरानावर आग लागल्याने त्या ठिकाणी जाण्यास अग्निशमन दलाच्या बंबांना जाण्यास मार्ग नसल्याने तेथे बंब जाऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीचे महानगरचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सहकार्यांसह वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जाण्यासाठी मार्ग नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांनी दुचाकीने जाऊन नुकसानीची पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत वणवा धुमसत होता.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००