कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात अहवालानुसार एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर २४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जळगाव शहरातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ५०८ कोरोना बाधित रूग्ण आढळले त्यापैकी १ लाख ४८ हजार ८८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आतापर्यंत २ हजार ५९१ कोरोना बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २४ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content