Big Breaking : पिंपळकोठ्याजवळ भीषण अपघातात चार जागीच ठार; एक गंभीर

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

 

याबाबत माहिती अशी की, एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक (एमएम १९ सीझेड ७३६०) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान मयताची अद्याप नावे कळू शकली नाही. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

 

यावेळी सुमारे १ तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पाळधी येथील वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Protected Content