शालेय कुस्ती स्पर्धेत नांद्रा विद्यालयाचे यश

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दि शेंदुणी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप सोसायटी संचालित नांद्रा येथील अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे पाचोरा तालुका स्तरीय स्पर्धेत शालेय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात – यामिनी चंद्रकांत कोळी ७१ किलो गटात (प्रथम), मिनश्री तुकाराम मोरे ५० किलो गटात (प्रथम), १७ वर्षे वयोगटात – पल्लवी अशोक कोळी ३५ किलो गटात (प्रथम), पायल ज्ञानेश्वर कोळी ६१ किलो गटात (प्रथम), कांचन चंद्रकांत कोळी ७१ किलो वजन गटात (प्रथम), तुषार नथ्थू कोळी ७१ किलो वजन गटात (प्रथम) वरिल खेळाडूची जिल्हास्तरावर खेळण्यासाठी निवड झाली असुन या स्पर्धा चाळीसगांव येथे खेळण्यासाठी जातील.

विजयी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिष काशीद, महिला संचालिका उज्वला काशीद, सहसचिव दिपकराव गरुड, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, स्थानिक सल्लागार समिती, मुख्याध्यापक आर.एस. चौधरी, पर्यवेक्षक एस. व्ही. शिंदे सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वानी खेळाडूचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस.आर. निकम, अविनाश निकम, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content