धावपटू संजीवनी जाधव दोन वर्षांसाठी निलंबित

sanjivani jadhav

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधवला डोपिंगप्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजीवनी (वय-23) ही मूळ नाशिकची राहणारी असून तिने २०१९ च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या 10 हजार मीटर शर्यतीचे कांस्यपदक जिंकले होते. त्याआधी २०१७ मध्ये तिने 5 हजार मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते. अखिल भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एआयएफएफ) अ‍ॅथलेटिक्स इंटेग्रिटी पथकाने (एआययू) गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. एआययूने दिलेल्या निर्णयात संजीवनी पहिल्यांदा दोषी आढळल्याने शिक्षेची तरतूद सौम्य स्वरुपाची आहे. २९ जून २०१८ पासून सर्व प्रकारच्या स्पर्धेतील तिची कामगिरी आणि निकाल रद्द करण्यात आले आहेत. तिच्या निलंबनाचा कालावधी २९ जून २०१८ पासूनच लागू झाला.

Protected Content